मुंबई :
महानगरी मुंबईमध्ये दिवसाला अनेक घटना घडत असतात. त्या प्रत्येक घटनेवर नजर ठेवणारा असतो तो मुंबईचा पोलिस. कोण नजर ठेवतो तर कोण नजर ठेवायला लावतो. सायन पोलिसात गुरूवारी एका विवाहिता आत्महत्या करत असल्याची तक्रार कुटुंबियांनी दाखल केली. सायन पोलिस स्थानकातील साहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत कांबळे यांनी माहिती घेतल्यानंतर महिलेने चिठ्ठी लिहून ठेवल्याचे सांगत ती घराबाहेर पडल्याचे सांगितले. कांबळे यांनी माहिती घेऊन मोबाईलद्वारे लोकेशन शोधून काढले.
या घटनेत जमेची बाजू होती ती म्हणजे आत्महत्या करणार्या विवाहित महिलेचा मोबाईल सुरू होता. मोबाईलच्या लोकेशनचा आधार घेत साहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत कांबळे आणि त्यांचे सहकारी अंमलदार दीपक जाधव वांद्रे रिक्लमेशनवर दाखल झाले. यावेळी आत्महत्या करण्यासाठी समुद्रावर आलेली महिला गळाभर पाण्यातील खडकावर बसून होती. महिलेला बघितल्यानंतर प्रशांत कांबळे यांनी पाण्यातून बाहेर येण्याची विनंती केली, पोलिस घटनास्थळी आले म्हणून महिलेने जीव देण्यासाठी पाण्यात उडी मारली. यावेळी क्षणाचाही विलंब न करता कांबळे यांनी समुद्राच्या पाण्यात उडी मारून महिलेचा जीव वाचवला. साहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत कांबळे यांच्या कार्यत्परतेमुळे एका महिलेचे प्राण वाचले. प्रशांत यांनी जीव वाचवल्यामुळे चिमुकल्याला त्याची आई परत मिळाली आहे.
साहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत कांबळे यांच्या धाडसामुळे त्या महिलेचे प्राण वाचले असल्याने मुंबई पोलिसांची समाजाशी असलेली नाळ पुन्हा एकदा आधोरेखित झाली आहे.

Post a Comment