होय, महात्मा गांधी याच्या जीवनावर आधारित ‘द गांधी मर्डर’ या चित्रपटाचे भारतातील प्रदर्शन रद्द करण्यात आले आहे.
येत्या ३० जानेवारीला महात्मा गांधींच्या पुण्यतिथीच्या मुहूर्तावर ‘द गांधी मर्डर’ हा सिनेमा प्रदर्शित होतोय. पण भारतात नाही तर भारताबाहेर. होय, महात्मा गांधी याच्या जीवनावर आधारित ‘द गांधी मर्डर’ या चित्रपटाचे भारतातील प्रदर्शन रद्द करण्यात आले आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शक व निर्मात्याला शारिरीक इजा पोहोचवण्याची धमकी देण्यात आल्यामुळे हा सिनेमा आता भारतात प्रदर्शित होणार नाही.
चित्रपटाच्या निर्मात्या लक्ष्मी आर अय्यर यांनी याबद्दल माहिती दिली. आयएएनएसशी बोलताना त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. आम्ही ‘द गांधी मर्डर’ भारतात प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत एक खूप मोठी बाजारपेठ आहे, इथे विविध प्रकारचे लोक राहतात. पण दुर्दैवाने काही तत्त्वांनी मला व दिग्दर्शकांना धमकी दिली आहे. शारिरीक इजा पोहोचवण्याचे या तत्त्वांनी म्हटले आहे, असे त्यांनी सांगितले.
करीम त्रैदिया आणि युएई स्थित दिग्दर्शक पंकज सहगल यांनी ‘द गांधी मर्डर’ हा चित्रपट बनवला आहे. ३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधींची हत्या झाली होती. या हत्येमागच्या घडामोडींवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या चित्रपटात केला गेला आहे. सेन्सॉर बोर्डाने गतवर्षीचं या चित्रपटाला पास केले होते. या चित्रपटात कुठलीही पक्षपाती भूमिका घेण्यात आलेली नाही. भारतीयांना सत्य जाणून घ्यायचे असेल तर हीच योग्य वेळ आहे. हा प्रासंगिक चित्रपट नाही तर एक व्यावसायिक अॅक्शन थ्रीलर चित्रपट आहे,असेही त्या म्हणाल्या.
धमकी देणाºया लोकांबद्दल विचारले असता, ते अज्ञात लोक आहेत. अनोळखी क्रमांकावरून कॉल करून आम्हाला धमक्या दिल्या जात आहेत, असे त्यांनी सांगितले. या चित्रपटात अमेरिकन अभिनेता स्टीफन लँग आणि दिवंगत अभिनेता ओम पुरी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Post a Comment