0
राम रहीमला कोर्टाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शिक्षा सुनावली

पंचकुला/पानिपत - पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्येप्रकरणी गुरमीत राम रहीमसह सर्व चार दोषींनी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. व्हिडिओ कॉन्फरन्सिगच्या माध्यमातून जज जगदीप सिंह बैस यांनी शिक्षा सुनावली. सीबीआयने राम रहीमला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती.

कोर्टाने गेल्या शुक्रवारी राम रहीम, निर्मल, कुलदीप आणि किशन लाल यांना दोषी ठरवले होते. राम रहीम सध्या दोन साधवींच्या बलात्कार प्रकरणी रोहतकच्या सुनारिया तुरुंगात शिक्षा उपभोगत आहे. आज सर्व आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कोर्टात हजर करण्यात आले.


राम रहीमला किमान जन्मठेप होण्याची शक्यता
कोर्टाने राम रहीम आणि किशन लालला आयपीसीच्या कलम 120बी, 302 नुसार दोषी ठरवले. तर कुलदीप आणि निर्मल यांना 120बी, 302 आणि आर्म्स अॅक्टनुसार दोषी ठरवले आहे. कलम 302 मध्ये किमान शिक्षा जन्मठेरेची आहे तर जास्तीत जास्त फाशीची शिक्षा सुनावली जाऊ शकते. निर्णयानंतर पत्रकार छत्रपती यांचा मुलगा अंशुलने राम रहीमला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती.


रामचंद्र यांनीच समोर आणले होते लैंगिक शोषण प्रकरण
साध्वी लैंगिक शोषण प्रकरणात जी पक्षे लिहिण्यात आली होती त्याआधारे रामचंद्र छत्रपती यांनी त्यांच्या वृत्तपत्रात वृत्त प्रकाशित केले होते. छत्रपती यांच्यावर आधी दबाव टाकण्यात आला. धमक्यांना घाबरले नाही तर 24 ऑक्टोबर 2002 ला त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. 21 नोव्हेंबर 2002 ला दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.


असे घडवले होते हत्याकांड
बाइकवर आलेल्या कुलदीपने गोळी घालून रामचंद्र यांची हत्या केली होती. निर्मलही त्याच्याबरोबर होता. ज्या बंदुकीने रामचंद्रवर गोळ्या घालण्यात आल्या होत्या त्याचा परवाना डेरा सच्चा सौदाचा मॅनेजर कृष्ण लालच्या नावावर होता. गुरमित राम रहीमवर कट रचल्याचा आरोप होता. राम रहीम सध्या दोन साधवींच्या लैंगिक शोषण प्रकरणी 20 वर्षांची शिक्षा भोगतोय.cbi special Court to announce verdict of Ram Rahim in journalist murder case 

Post a Comment

 
Top