0
मुंबई: शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित 'ठाकरे' चित्रपटातील 'हटाव लुंगी' शब्दांवर सेन्सॉर बोर्डानं आक्षेप घेतला होता. या शब्दांमुळे दक्षिण भारतीयांच्या भावना दुखावतील, असं मत सेन्सॉर बोर्डानं व्यक्त केलं होतं. त्यामुळे निर्मात्यांनी या शब्दांऐवजी दुसरे शब्द वापरले आहेत. चित्रपट सेन्सॉरच्या कात्रीत अडकू नये, यासाठी निर्मात्यांनी ही भूमिका घेतल्याचं बोललं जात आहे.

शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात बाळासाहेब ठाकरेंनी दाक्षिणात्यांविरोधात आंदोलन हाती घेतलं होतं. त्यावेळी 'हटाव लुंगी, बजाव पुंगी' अशी घोषणा शिवसेनेकडून देण्यात आली होती. याचं आंदोलनाचं चित्रण ठाकरे चित्रपटात आहे. मात्र ‘हटाव लुंगी’ या घोषणेवर सेन्सॉर बोर्डानं आक्षेप घेतला. यामुळे दक्षिण भारतीयांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात, असं सेन्सॉर बोर्डानं म्हटलं. त्यामुळे ठाकरे चित्रपटातून 'हटाव लुंगी' शब्द काढून त्याऐवजी 'उठाव लुंगी' असे शब्द वापरण्याची तयारी निर्मात्यांनी दर्शवली.

25 जानेवारीला ठाकरे चित्रपट प्रदर्शित होणार आहे. शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर अभिजीत पानसेंनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात बाळासाहेबांची भूमिका नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी साकारली असून मीनाताई ठाकरेंच्या भूमिकेत अमृता राव दिसणार आहेत.
 thackeray film producer changed slogan used in movie about protest against south indians | ...अन् 'ठाकरे'मधून हटवला 'तो' डायलॉग

Post a Comment

 
Top