0
'गरिबी हटाव' व 'अच्छे दिन' यांसारख्या आश्वासनांप्रमाणेच राहुल यांचे हे पाेकळ आश्वासन - मायावती

काेची : गरिबांना ठरावीक निश्चित रक्कम देण्याचे आश्वासन दिल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी मंगळवारी केरळच्या काेची येथे पुन्हा एक आश्वासन दिले. या वेळी त्यांनी लाेकसभा निवडणूक जिंकून काँग्रेस सत्तेत आल्यास महिला आरक्षण विधेयक पारित केले जाईल, अशी घाेषणा केली. ते येथे पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत बाेलत हाेते. काँग्रेसला महिलांना नेतृत्व करताना पाहायचे आहे. त्यामुळे आम्ही हे काम प्राधान्याने करून महिलांसाठी ३३ % आरक्षणाची तरतूद करू, असे त्यांनी सांगितले.


मायावतींनी उडवली खिल्ली

दुसरीकडे बहुजन समाजवादी पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी मंगळवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या प्रत्येक गरिबाला किमान निश्चित रक्कम देण्याच्या आश्वासनाची खिल्ली उडवली आगामी लाेकसभा निवडणुकीनंतर सत्तेत आल्यास देशातील प्रत्येक गरीब व्यक्तीला निश्चित ठरावीक रक्कम देण्यात येईल, असे आश्वासन राहुल गांधींनी साेमवारी दिले हाेते. याबाबत प्रतिक्रिया देताना त्यांनी ही टीका केली. तसेच 'गरिबी हटाव' व 'अच्छे दिन' यांसारख्या आश्वासनांप्रमाणेच राहुल यांचे हे पाेकळ आश्वासन असून, यासारखा दुसरा माेठा क्रूर विनाेद नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.If we come to power at the Center, we should apply women's reservation: Rahul Gandhi

Post a comment

 
Top