मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटात एस एन गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी झाल्याची घटना धामणदेवी गाव हद्दीत बुधवार सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.
टँकर चालक देवराम विर्मा रेबारी (वय २७, राजस्थान) हा गुजरातहून परशुराम लोटे येथील विनित कंपनी येथे एस एन गॅस घेऊन कशेडी घाटातून जात असता धामणदेवी हद्दीत एका अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटून टँकर पलटी झाला.
या अपघाताची माहिती समजताच कशेडी महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. महाड व खेड येथील अग्नीशमन दलाला पाचारण केले आहे. पोलादपूर, खेड व महाड येथून महामार्ग पोलिस घटनास्थळी तैनात केले आहेत. कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी पोलिस प्रशासन लक्ष ठेऊन आहे.
तसेच गॅस नियंत्रक पथक पाचारण करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. अपघाताची तीव्रता लक्षात घेऊन महामार्गावरील वाहतूक खेड बाजूकडून तुळशी खिंड विन्हेरे मार्गे महाड तर महाड बाजूची वाहतूक राजेवाडी विन्हेरे मार्गे वळवण्यात आली आहे. गॅस टँकर असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस प्रशासन लक्ष ठेऊन आहे.

Post a Comment