कराड :
आगामी लोकसभेच्या निवडणुकांवरुन देशभरातील राजकीय वातावरण आतापासूनच तापायला लागले आहे. यातच भाजप आणि शिवसेनेची युती टिकणार की तुटणार? हा चर्चेचा विषय ठरत आहे. दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर टीका करत स्वबळाची घोषणा देत आहेत. यातच आता कराड (जि. सातारा) येथील एका कार्यक्रमात परिवहन मंत्री ना. दिवाकर रावते यांनी विचारलेल्या कोण अमित शहा? या प्रश्नावरुन राजकीय वातावरण आणखीनच तापले आहे.
वाचा : १२ वर्षाच्या मुलाचा ४५ वर्षीय महिलेकडून विनयभंग
सोमवारी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कराड येथील नूतन बसस्थानकाचा लोकार्पण सोहळा मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते झाला. या सोहळ्यानंतर पत्रकारांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी लोकसभेच्या जागांसंदर्भात केलेल्या वक्तव्यबाबत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना प्रश्न विचारला असता त्यांनी कोण अमित शहा? असा प्रतिप्रश्न पत्रकारांनाच केला. पत्रकारांनी पुन्हा भाजपचे अध्यक्ष अमित शहा असे संगितल्यावर परिवहन मंत्री रावते यांनी ते भाजपचे अध्यक्ष आहेत का? असा पुन्हा प्रतिप्रश्न करून अमित शहांना महत्त्व दिले नाही. यावरून भाजप आणि शिवसेना यांच्यातील संबंध ताणले असल्याचेच दिसून येत आहेत. त्यांनी पत्रकारांच्या या प्रश्नाला बगल देऊन उत्तर देण्याचेही टाळले.
वाचा : बेस्ट संपामुळे मुंबईकरांचे हाल, रिक्षा-टॅक्सी चालकांकडून लूट
‘आगामी निवडणुकीसाठी शिवसेना सोबत आली तर ठिक नाहीतर, त्यांना आस्माना दाखवू.’ असे वक्त्व्य गेल्या आठवड्यात लातूर येथे झालेल्या सभेत अमित शहा यांनी केले होते. त्यांच्या याच वक्तव्यावरुन दिवाकार रावते यांनी अशी प्रतीक्रीया दिल्याचे बोलले जात आहे.
नूतन बसस्थानकाचा लोकार्पण सोहळ्यासाठी खा. छत्रपती उदयनराजे भोसले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आ. बाळासाहेब पाटील, आ. आनंदराव पाटील, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, परिवहन महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक राहूल तोरे, कराडचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे उपस्थित होते.

Post a Comment