0
पुणे :

पुणे शहराला सध्या १३५० टीएमसी पाणी देण्याचा निर्णय जलसंपदा विभागाकडून घेण्यात आला असल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. पुणे शहराला होणाऱ्या पाणीपुरवठा बाबत सध्या वातावरण तापले आहे. खेलो इंडिया युथ गेम्ससाठी महाजन बालेवाडी येथे आले होते. त्यावेळी त्‍यांनी माहिती दिली.

पुण्याला सध्या १३५० टीएमसी पाणी जलसंपदा विभागाकडून दिले जात आहे. हे पाणी असेच सुरू ठेवण्याचे आदेश सध्या तरी दिलेले आहेत. धरणामध्ये पाण्याचा साठा किती शिल्लक आहे याबाबत माहिती घेतलेली आहे. तसेच, उन्हाळ्यात शेतीसाठी तसेच पिण्यासाठी पाणी शिल्लक कसे राहील याबाबत विचार सुरू आहे. जलसंपदा विभागाचे अधिकारी, महापालिकेचे काही अधिकारी यांची संयुक्त बैठक मंगळवारी मुबईत आयोजित करण्यात आली आहे. त्यामध्ये उन्हाळ्यातील पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असे त्यांनी सांगितले आहे.

Post a Comment

Top