0
वैजापुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन यात्रेत बोलत होते.

वैजापूर - नरेंद्र मोदी सरकारची देशभरात सुरु असलेली हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यात निर्धार परिवर्तन यात्रा काढली असून येत्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपची अकार्यक्षम सरकार सत्तेतून हद्दपार करण्यासाठी संघटित व्हा, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी वैजापूर येथील जाहीर सभेत केले. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन यात्रेत बोलत होते.या वेळी औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीच्या उमदेवाराला विजयी करुन परिवर्तन घडवा, असे साकडे घातले. या वेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष फौजिया खान, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, आमदार भाऊसाहेब पा. चिकटगावकर, जिल्हा कार्याध्यक्ष अभय पाटील चिकटगावकर, जिल्हा उपाध्यक्ष शैलेश सुराशे, तालुकाध्यक्ष बाळासाहेब भोसले, अजय पाटील चिकटगावकर, साईनाथ मतसागर,बंटी मगर, प्रेम राजपूत, सागर गायकवाड, गणेश पवार टेंभीकर, अमोल चिकटगावकर आदी उपस्थित होते.

औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेच्या खासदारांनी काय विकास केला, असा सवाल त्यांनी विचारत येत्या निवडणुकीत औरंगाबाद येथून काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचे आवाहन त्यांनी करत लोकसभा निवडणूक प्रचाराचा शुभारंभ या सभेच्या माध्यमातून केला. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शिवसेना-भाजपमधील राज्यात दोन कुत्र्यांमधील भांडण आहे. भाजप सरकारच्या राजवटीत शेतकरी आत्महत्या,बेरोजगारी, महागाई पापात शिवसेनाही तितकीच जबाबदार असल्याची घणाघाती टीका बोलताना केली.
The inefficient BJP government unite to oust the government


Post a Comment

 
Top