0


ठरावीक काळात येणार्‍या तसेच कायम उपलब्ध होणार्‍या सर्व प्रकारच्या भाज्यांमध्ये अनेक प्रकारचे पोषकद्रव्ये असतात. ही पोषकद्रव्ये शरीरासाठी खूपच महत्त्वाची असतात. यामुळे आपल्याला वेगवेगळ्या आजारांपासून संरक्षण मिळतेच सोबतच आपले शरीरही फिट राहते. हिरव्या भाज्यांचे सूप असो वा साधी भाजी, कोणत्याही प्रकारे भाज्यांचे सेवन केले तरी त्यांच्यापासून फायदा मिळतोच. भारतात भाज्या बनविण्याच्याही वेगवेगळ्या पद्धती आणि परंपरा आहेत. दोन अथवा जास्त भाज्याही एकत्र बनविल्या जातात. या भाज्यांमधून अनेक फायदे मिळतात.
1) पालक-बटाट्याची भाजी

 बारा महिने मिळणार्‍या पालकचे शरीराला अनेक फायदे असतात. यात अन्‍नपचनासाठी आवश्यक असणारे लोह आणि फायबर मोठ्या प्रमाणावर असते. बटाट्यात असणार्‍या कर्बोदकांमुळे शरीराला ऊर्जा मिळते. बटाटा आणि पालकची एकत्र भाजी बनविल्यास दोन्हींमधील पोषणमुल्ये अजूनच फायदेशीर ठरतात. या भाजीत फॅट, सोडीअम आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाणही खूप कमी असल्याने हृदयरोग्यांसाठी ही भाजी फायदेशीर असते. सोबतच फायबर, मँगनीज, पोटॅशियम, व्हिटॅमिन ‘अ’, ‘ब6’ आणि ‘क’चे भरपूर प्रमाण असल्यामुळे चेहर्‍यावरील सुरकुत्याही कमी होतात. 

2) भोपळा आणि हरभरा डाळ

भोपळ्यात पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. यामुळे शरीरातील सर्व अनावश्यक घटक बाहेर पडून रक्‍ताचे शुद्धीकरण केले जाते. भोपळ्यात व्हिटॅमिन ‘अ’, ‘क’, मिनरल्स, मँगनीज, फॉस्फरस आणि फोलेटचा खजाना असतो. सोबतच दाळीमध्येही मोठ्या प्रमाणावर फायबर असते. दाळ आणि भोपळ्याची एकत्र भाजी बनविल्यास यामध्ये प्रथिनांचे प्रमाण सर्वाधिक असते. सोबतच फॉलिक अ‍ॅसिड, कर्बोदके, फायबर आणि शरीराला अ‍ॅक्टीव ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ऊर्जा मिळते. यामुळे अशक्‍तपणा आणि थकवा दूर होतो. 

3) बटाटा-टोमॅटोची भाजी

भारतातील अनेक घरांमध्ये बटाटा आणि टोमॅटोची एकत्र भाजी केली जाते. यामुळे वेळ आणि कष्टाचीही बचत होते. घरातली लहानथोरांनाही ही भाजी आवडते. साध्यासोप्या असलेल्या या भाजीमध्ये बटाट्यातील सर्वच पोषकद्रव्ये मिसळून जातात. या भाजीमध्ये सॅच्यूरेटेड फॅट आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नगण्य असते. यामुळे हृदयरोगापासून मुक्‍ती मिळते. सोबतच अन्‍नपचनासाठी आवश्यक फायबरचे प्रमाण, पोटॅशियम, व्हिटॅमिन ‘अ’, ‘ब6’ मोठ्या प्रमाणात असते. या भाजीत सोडीअमचे प्रमाण वाढल्याने शरीरासाठी अपायकारक असते.

4) कोबी-वाटाण्याची भाजी

अँटी ऑक्सीडंट्स आणि व्हिटॅमिन ‘क’ असलेल्या कोबीमध्ये मँगनिज आणि कॅरोटिनॉयड्ससारखेे पोषणमुल्ये असतात. या पोषणमुल्यांमुळे फ्रि रॅडिकल्स नुकसान होण्यापासून वाचतात. कार्डिओ व्हॅस्कुलर आणि कर्करोगासारखा आजारही यामुळे दूर राहतो. यात असलेले व्हिटॅमिन ‘क’ रोगप्रतिकारक शक्‍ती वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. वाटाण्यांमध्ये पोटॅशिअमसह फायबरही मोठ्या प्रमाणात असते. कोबी आणि वाटाण्याची भाजीत कोलेस्ट्रॉल आणि सोडीअम नसते. सोबतच मँगनिज, पोटॅशिअम, विटॅमिन ‘ब6’ आणि ‘क’ यात मोठ्या प्रमाणावर असते. 

5) घोसाळे आणि हरभर्‍याची भाजी

काळ्या हरभर्‍यात मोठ्या प्रमाणावर फायबर असते. यामुळे अपचन, बद्धकोष्टता, पित्त यासारख्या सर्व समस्या दूर राहतात. घोसाळ्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. घोसाळे शरीराला हायड्रेट ठेवण्याचे काम करते. घोेसाळे आणि हरभर्‍याची भाजी खूपच फायदेशीर असते. कारण व्हिटॅमिन ‘अ’ आणि ‘क’ शरीराला ऑक्सिडाईज्ड करण्याबरोबरच रक्‍तवाहिन्या योग्य ठेवतो. यामुळे रक्‍ताभिसरण व्यवस्थित होते. 

Post a Comment

 
Top