स्वातंत्र संग्रामातही ते सहगाभी झाले होते. उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना केंद्र सरकारने 2003 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने
मुंबई/नागपूर- मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश आणि ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत चंद्रशेखर धर्माधिकारी यांचे गुरुवारी (ता.3) सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी नागपुरात एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या पार्थिवावर आंबझरी स्मशानभूमीत सायंकाळी 5 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी यांचा जन्म 20 नोव्हेंबर 1927 रोजी मध्य प्रदेशातील रायपूर शहरात झाला होता. नागपूर येथील महापालिकेच्या शाळेत त्यांचे प्राथमिक शिक्षण घेतले. स्वातंत्र संग्रामातही ते सहगाभी झाले होते. उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना केंद्र सरकारने 2003 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते.
चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी न्यायमूर्ती म्हणून सेवा देताना जवळपास 17 वर्षे न्यायदान केले. या काळात धर्माधिकारी यांन महिला, आदिवासी, लहान मुले, मानसिक आजारासंदर्भातील मुलभूत अधिकारासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. याशिवाय धर्माधिकारी हे एक उत्तम लेखक होते. त्यांनी हिंदी, मराठी, गुजराती भाषेत पुस्तके लिहिली आहेत.

Post a Comment