नवी दिल्ली :
लोकसभा निवडणूक तोंडावर असताना प्रियांका गांधी- वधेरा यांनी अधिकृतपणे राजकारणात प्रवेश केला आहे. आता प्रियांका गांधी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणसी येथून निवडणूक रिंगणात उतरवले जाणार असल्याची अटकळ बांधली जात आहे. याबाबत काँग्रेसचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी एक ट्वीट करत तसे संकेतही दिले आहेत.
''मोदीजी आणि अमित शहा यांनी म्हटले होते की, काँग्रेस मुक्त भारत... आता प्रियांका गांधी यांची उत्तर प्रदेशमधील पूर्वांचल भागात एंट्री होत असल्याने आता आम्ही बघणार आहोत.... मुक्त वाराणसी?....मुक्त गोरखपूर?'' असे ट्वीट सिब्बल यांनी केले आहे.
राजकीय क्षेत्रात या ट्वीटची जोरदार चर्चा होत असून प्रियांका यांना उत्तर प्रदेशातील पूर्वांचल भागातील वाराणसी अथवा कोणत्याही जागेवरून निवडणूक रिंगणात उतरवले जाऊ शकते.
पूर्वांचलमध्ये भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसची रणनिती...
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमधील पूर्वांचल भागावर काँग्रेसने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. कारण पूर्वांचलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसी मतदारसंघ आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ नेतृत्व करत असलेला गोरखपूर मतदारसंघ आहे. पूर्वांचल हा भाजपचा बालेकिल्ला आहे. यामुळे भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेसने पूर्वांचलची जबाबदारी प्रियांका गांधी यांच्याकडे दिली आहे.

Post a Comment