0
मोकाट कुत्र्यांनी घरासमोरच खेळत असलेल्या सोहेब रहीम पठाण (वय-५ वर्ष, रा. सिल्लोड) या ५ वर्षीय बालकावर हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात बालक गंभीर जखमी झाला. त्याच्यावर सिल्लोड येथील रुग्णालयात उपचारानंतर औरंगाबादला पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले.सिल्लोड शहरात दिवसेंदिवस मोकाट कुत्र्याचा उपद्रव वाढला आहे. शहरातील शिक्षक कॉलनी, मीरजा कॉलनी, गुलशन नगर, आव्हाना रोड, बापू नगर झोपडपट्टी, परिसरात मोकाट कुत्र्यांचे प्रमाण वाढले आहे. तर या कुत्र्याकडून लोकांवर हल्ले होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. आज या हल्ल्यात पाच वर्षीय बालक गंभीर जखमी झाला. मागील आठवड्यात एकूण ८ जणांवर हल्ले झाल्याची घटना घडल्या. यामुळे सिल्लोड शहरात घबराट पसरली आहे. यामुळे नागरिकांकडून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

Post a Comment

 
Top