0


कराड (सातारा) :
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सांगली आगारात वडील चालक म्हणून कार्यरत होते, त्यामुळे एसटीचे आपणही काहीतरी देण लागतो या उद्दात हेतूने कराडचे उप प्रादेशिक अधिकारी अजित शिंदे आणि त्यांचे बंधू डॉक्टर बजरंग शिंदे यांनी स्व. बाळकृष्ण शिंदे यांच्या स्मरणार्थ स्वखर्चातून कराड बसस्थानकावर लाखो रुपये खर्च करून वातानुकूलित विश्रांती कक्षाची स्थापना केली आहे.
राज्यातील पहिला विश्रांती कक्ष असून यामुळे एसटीचे चालक-वाहक यांना राहण्यासाठी सुसज्ज असे २९ बेड, जेवण्यासाठी स्वतंत्र कक्ष, वातानुकूलित रुम, आंघोळीच्या गरम पाण्यासाठी सोलरची सोय केली आहे. यामुळे एसटी अपघातांचे प्रमाण काही प्रमाणात कमी होईल, असा विश्वास अजित शिंदे यांनी व्यक्त केला आहे.आता राज्यातील अन्य नव्याने होणार्‍या बसस्थानकातही अशी सोय करू असे ना. दिवाकर रावते यांनी जाहीर केले असून शिंदे बंधूंच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले आहे. 

Post a Comment

 
Top