भोपाळ (मध्य प्रदेश) :
वाघ कधीही वाघाला आपले सावज बनवित नाही आणि त्याचे मांसही खात नाही. मात्र, मध्य प्रदेशातील कान्हा नॅशनल पार्कमध्ये एका प्रौढ वाघाने म्हाताऱ्या वाघिणीची शिकार करून तिचे मांस खाण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही घटना दुर्मिळ असल्याचे कान्हा नॅशनल पार्कच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
प्रत्येक वाघाचे क्षेत्र निश्चित असते. आपल्या क्षेत्रात वर्चस्व सिद्ध करण्यासाठी झालेल्या लढाईत प्रौढ वाघाने म्हाताऱ्या वाघिणीला मारले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
अधिक मिळालेल्या माहितीनुसार, कान्हा नॅशनल पार्क हे वाघांसाठी राखीव क्षेत्र आहे. येथे वाघांची संख्या अधिक आहे. मात्र, येथे गेल्या शनिवारी पार्कमध्ये देखेरख ठेवणाऱ्या एका पथकाला वाघिणीचा मृतदेह मिळाला. तो छिन्नविच्छिन्न अवस्थेत होता. मृत वाघिणीच्या डोक्याची कवटी आणि केवळ पंजे मिळाले आहेत. तर वाघिणीच्या शरिराचा अन्य भाग खाऊन टाकला आहे. प्रौढ वाघाने म्हाताऱ्या वाघिणीची शिकार करून तिला खाल्याने वन अधिकारी चक्रावून गेले आहेत.
नॅशनल पार्कमध्ये शिकार करण्यासाठी अन्य प्राणी उपलब्ध असताना वाघाने वाघिणीची शिकार करून तिला खाऊन टाकले आहे, अशी घटना यापूर्वी कधीही घडली नव्हती, अशी माहिती कान्हा नॅशनल पार्कचे संचालक के. कृष्णमूर्ती यांनी दिली आहे.

Post a Comment