0
कोळेकरने स्नॅचमध्ये ९० किलो, तर क्लीन व जर्कमध्ये १२१ किलो असे एकूण २११ किलो वजन उचलत सुवर्ण जिंकले.

पुणे- खेलाे इंडियाअंतर्गत स्पर्धेत बुधवारी (दि.८) झालेल्या वेटलिफ्टिंगमध्ये २१ वर्षांखालील गटात महाराष्ट्राच्या शुभम कोळेकर याने ५५ किलो गटात क्लीन व जर्क प्रकारात तब्बल १३९ किलो वजन उचलत यापूर्वी स्वत: नोंदवलेला १३८ किलो हा विक्रम मोडला. तसेच त्याने स्नॅचमध्ये ९७ किलो असे एकूण २३६ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. शुभम हा सांगलीचा. त्याने यापूर्वी विशाखापट्टणम येथे झालेल्या कनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत कांस्यपदक, तर नागपूर येथे नुकत्याच झालेल्या युवा गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले होते. तो संतोष सिंहासने यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. याचबरोबरच वेटलिफ्टिंगमधील १७ वर्षांखालील ५५ किलो वजनी गटात महाराष्ट्राच्या अभिषेक महाजन यानेदेखील चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. त्याने स्नॅचमध्ये ९० किलो, तर क्लीन व जर्कमध्ये १२१ किलो असे एकूण २११ किलो वजन उचलत सुवर्ण जिंकले.
Kolkar win Gold Medal in Weight Lifting competition

Post a comment

 
Top