0
मुंबई :

विनता नंदा लैंगिक छळ प्रकरणात आलोक नाथ यांना अटकपूर्व जामीन मिळाल्‍यानंतर अभिनेते आलोक नाथ यांनी मौन सोडले आहे.  मीटू मोहिमेंतर्गत निर्माती-लेखिका विनता नंदा यांनी आलोक नाथ यांच्‍यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. परंतु, आलोक नाथ यांनी हे आरोप फेटाळले आहेत. आलोक नाथ यांच्‍याविरोधात विनता यांनी पोलिसांत तक्रार केली होती. त्‍यानंतर आलोक नाथ यांच्‍याविरोधात गुन्‍हा दाखल झाला होता. परंतु, अटकपूर्व जामीन मिळावा म्‍हणून  या प्रकरणात आलोक नाथ यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला होता.
जामीन मिळाल्‍यानंतर आलोक नाथ म्‍हणाले, 'माननीय न्‍यायालय आणि माझ्‍या वकिलांनी मला शांत राहण्‍याचा सल्‍ला दिला होता. खरंतरं, मी पूर्णपणे शांत राहिलो आहे. कुठलेही वक्‍तव्‍य केले नाही. होऊ शकते की, रागाच्‍या भरात माझ्‍याकडून काही शब्‍द आले असतील. मी ३ महिने शांत राहिलो आहे. सध्‍या मी बोलणे योग्‍य नाही. परंतु, हा, मला अटकपूर्व जामीन मिळाला आहे. आणि यासाठी आम्‍ही आपले खूप आभारी आहोत. ज्‍यावेळी मला बोलायचे असेल, त्‍यावेळी मी प्रामाणिकपणे आपल्‍याशी बोलेन. आलोक यांनी त्‍यांची पत्नी आशु यांचे आभार मानले आहे. ती माझ्‍यासाठी शक्ती स्तंभाप्रमाणे उभी आहे. ईश्‍वराचेही आभार.' 

विनता नंदा यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी आलोकनाथ यांचे नाव नव्हते घेतले. मात्र त्यांनी असे म्हटले होते की, बलात्कार करणारी व्यक्ती अभिनय क्षेत्रातील संस्कारी व्यक्ती आहे.
त्यानंतर विनता यांनी आलोकनाथ यांच्याविरोधात पोलिसात २१ नोव्हेंबर, २०१८ ला तक्रार दाखल केली होती. आलोकनाथ यांच्या वकिलांनी २३ डिसेंबर, २०१८ ला न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. यावर सुनवाणीवर होऊन त्यांना जामीन देण्यात आला.

Post a comment

 
Top