0
नवी दिल्ली : 

दिल्लीतील शकरपूर भागात झालेल्या एका लग्न सोहळ्यात गुरुवारी रात्री उशिरा गोळीबाराची घटना घडली आहे. विशेष म्हणजे आनंद साजरा करण्यासाठी झाडलेली एक गोळी थेट स्टेजवरील नववधूच्या पायाला लागली. यात ती जखमी झाली आहे.

अधिक मिळालेल्या माहितीनुसार, शकरपूर भागात ही घटना घडली आहे. ज्यावेळी नववधू वरमाला घालण्यासाठी स्टेजवर चढली त्यावेळी अचानक एका व्यक्तीने आनंदाने गोळीबार केला. यातील एक गोळी वधूच्या पायाला लागली आणि ती स्टेजवर कोसळली. हा प्रकार पाहताच लग्नातील वर्‍हाडी मंडळी घाबरली. नवऱ्या मुलालाही नेमके काय झाले हे काही कळाले नाही. त्यानंतर नववधूला लगेच इस्पितळात नेण्यात आले. उपचारानंतर वधूला परत आणून लग्न सोहळा पार पाडण्यात आला.

''लग्नात नेमका कोणी गोळीबार केला हे कळाले नाही. मात्र, गोळी नववधूच्या पायाला लागली आहे. त्यानंतर आम्ही पोलिसांनी बोलावले'', असे वर आणि वधूच्या कुटुंबियांनी सांगितले.

दिल्ली पोलिसांनी लग्नात गोळीबार करण्याऱ्याची ओळख पटविली आहे. त्याच्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे.


Post a Comment

 
Top