0
महिला आपल्या पतिसोबत बुनकरचा फॉर्म भरण्यासाठी गेली होती

भदोही (उत्तर प्रदेश)- गोपीगंज परिसरात एका महिलेला नग्न करून मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. गुंडांनी महिलेच्या पतिलाही घरात घुसून मारले. घाबरलेल्या महिलेने स्वत:रूममध्ये बंद केले. पोलिस घटनास्थळी पोहचले तेव्हा ती महिला खुप घाबरलेली होती आणि तिच्या तोडातून शब्दच फुटत नव्हते.

शनिवारी महिला आपल्या पतिसोबत बुनकरचा फॉर्म भरण्यासाठी गेली होती. तेथे गावातील गुंड लाल चंद याने महिलेची छेड काढली. महिला आणि तिच्या पतिने याचा विरोध केल्यावर आरोपी लाल चंद याने शिव्या देणे सुरू केले. आसपासच्या लोकांनी मध्यस्थी करून प्रकरण शांत केले.

पण रविवारी लाल चंद 6-7 गुंडाना घेऊन आला आणि महिलेच्या घरात घुसला. त्यानंतर महिलेच्या पतिलाही खुप मारले आणि महिलेला अर्धनग्न करून गावात पळवले. खुप वेळ हा त्यांचा तमाशा सुरू होता पण कोणीचा त्यांची मदत केली नाही.

महिलेच्या पतिने पोलिसांवर आरोप लावला आहे की, पोलिस प्रकरण हलक्यात घेत आहे.

Post a Comment

 
Top