0
कोलकाता : 

आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये प्रबळ भारतीय जनता पक्षाला टक्कर देण्यासाठी बंगालच्या भूमीत आज तब्बल २२ विरोधी राजकीय पक्ष मतभेद विसरून एकत्र आले आहेत. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपविरोधी रॅलीचे आयोजन केले आहे. या रॅलीच्या व्यासपीठावरून भाजपवर सर्वांनीच शरसंधान केले.


उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, डीएमके नेते एम. के. स्टॅलिन, आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आदी नेत्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी भाजपवर कडाडून प्रहार केला.

ते म्हणाले की, बंगाल सर्व देशाला मार्ग दाखवेल, आमच्याकडे (महाआघाडीमध्ये) अनेक पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत, त्यामुळे पंतप्रधान कोण होणार म्हणून मजाक उडवत आहेत. पण पंतप्रधान कोण होईल हे जनताच ठरवेल, पण आम्ही तुम्हाला विचारत आहोत, तुम्हाला कोणी पराभूत केल? देशातील जनतेला कोणी नाराज केलं? द्वेष पसरवण्याचे गलिच्छ राजकारण कोण करत आहे? हे सर्व भाजप करत आहे. सबका साथ सबका विकास देत असतानाच ते समाजात विष पेरण्याचे काम करत आहेत. पंतप्रधान मोदी यांचा संदेश म्हणजे द्वेषाचा संदेश आहे.

भाजप सीबीआय आणि ईडी सारख्या तपाससंस्थांबरोबर आघाडी करत आहे, पण आम्ही देशातील जनतेशी आघाडी केली आहे. बसप आणि सपने भाजपविरोधात आघाडी स्थापन केली आहे, आम्ही सर्व पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे भाजपला असुरक्षित वाटू लागले आहे. 

Post a Comment

 
Top