0
लंडन : 

जगभरात काही देश असे आहेत जिथे गरिबी औषधालाही शिल्लक नाही. शेजार्‍याने अमूक वस्तू खरेदी केली, आम्ही नाही, असेही कुणी तिथे कुरकुरत नाही! सर्वांची खरेदी क्षमताही सारखीच आहे. लक्झमबर्ग, स्वित्झर्लंड आणि मकाओ हे देश जीडीपीनुसार श्रीमंत देश म्हटले जातात. ज्या देशात कोणी कधीच उपाशी झोपत नाही ते श्रीमंत देश; पण आता नवी यादीही समोर आली आहे. यात सिंगापूर, ब्रुनई आणि कुवैत हे देशही आहेत.
लक्झमबर्ग हा देश युरोपातला  सर्वात श्रीमंत देश मानला जातो. कर वाचवणार्‍यांचा देश म्हणूनही या देशाकडे पाहिले जाते. इथे ठराविक वयानंतर श्रीमंत लोक राहायला येतात. आरामात आयुष्य जगता येते. नॉर्वेला उगवत्या सूर्याचा देश मानले जाते. या देशाची जीडीपी नेहमीच चांगली असते. नैसर्गिक गॅस आणि तेल यांच्या निर्यातीवर या देशाची अर्थव्यवस्था आहे.कतारची लोकसंख्या जवळजवळ 20 लाख आहे. जीडीपी जवळजवळ 182 बिलियन डॉलर आहे. तेलाची निर्यात, टुरिझम, बँकिंग यावर देशाची अर्थव्यवस्था आहे. स्वित्झर्लंड हा युरोपमधील श्रीमंत देशांमध्ये दुसर्‍या क्रमांकावर आहे. पर्यटनावर या देशाची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. ब्रुनेई हा आग्‍नेय आशियातील श्रीमंत देश. गॅस आणि कच्च्या तेलाची निर्यात या देशातून होते. सिंगापूर 63 द्वीपसमूहांनी बनले आहे. पर्यटनावर अर्थव्यवस्था अवलंबून असलेला हा देशही श्रीमंत आहे.

Post a Comment

 
Top