पुणे :
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात उद्घाटनाचा वाद सुरू असतानाच आता आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीच्या हस्ते करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे. नयनतारा सहगल प्रकरणाचा वाद विकोपाला गेल्यानंतर अनेक साहित्यिक, विचारवंत, प्रकाशक यांनी संमेलनावर बहिष्कार घातला आहे. किसान न्याय हक्क समितीने हे संमेलन उधळण्याचा इशारा दिला होता. याप्रकरणी हे संमेलन आत्महत्या केलेल्या शेतकर्याच्या पत्नीच्या हस्ते उद्घाटन करण्याचा निर्णय आयोजकांतर्फे घेण्यात आला आहे. डॉ. श्रीपाद जोशी यांनी महामंडळ अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर गुरुवारी उपाध्यक्ष विद्या देवधर यांनी ही घोषणा केलीयवतमाळ येथे शुक्रवार (ता.११) पासून आयोजित ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उदघाटन यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विधवा शेतकरी महिलांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यामुळे, यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न जगाच्या पातळीवर चर्चिले जाणार आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न साहित्यिकांच्या रूपाने ऐरणीवर येणार आहेत. शेतकर्यांच्या वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी या व्यासपीठावरून शासनाला निर्देश देण्यात येतील अशी भाषणे होण्याची शक्यता आहे. दरम्यान यवतमाळ येथील ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन वैशाली येडे या विधवा शेतकरी महिलेच्या हस्ते होणार असल्याची घोषणा या पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आली.
महामंडळाच्या उपाध्यक्षा विद्या देवधर म्हणाल्या, की साहित्य महामंडळाच्या घटनेप्रमाणे उपाध्यक्ष ह्या अध्यक्ष आहेत. त्यामुळे, आज आपल्या अध्यक्षतेखाली महामंडळाची सभा झाली. सर्व महामंडळाचे प्रतिनिधी या सभेला उपस्थित होते. त्यामध्ये खेळीमेळीची चर्चा होऊन चांगल्या प्रकारे संमेलनाचे उद्घाटन व्हावे यावर निर्णय झाला. यवतमाळ जिल्हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील आहे. शेतकऱ्यांचे मोठे प्रश्न या ठिकाणी आहेत. त्यामुळे, आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन व्हावे, अशी सूचना आयोजक संस्थेने केली. आयोजक आता त्या संदर्भात चर्चा करतील आणि घटकाचे नाव निश्चित करणार आहे. चांगला कार्यक्रम होईल, कुठलाही गोंधळ होणार नाही, अशी ग्वाही देखील देवधर यांनी दिली.
महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी राजीनामा दिला असला तरी ते या संमेलनाला हजर राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच, उद्घाटिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द झाल्यानंतर साहित्यकांनी जे बहिष्कार अस्त्र उगारले होते यातील केवळ दहा साहित्यकांनी नकार कळवला होता. मात्र, त्यांना संमेलनात उपस्थित राहण्याचे आवाहनही महामंडळाच्या हंगामी अध्यक्षा विद्याताई देवधर यांनी केले. महामंडळाचे अध्यक्ष पूर्वाध्यक्ष श्रीपाद जोशी संमेलनाला येणार का? असा प्रश्न केला असता तरी अद्याप पर्यंत विदर्भ साहित्य संघाने तिसरा सभासद दिला नाही. त्यांनी संमेलनाला यावे किंवा नाही? हा त्यांचा प्रश्न आहे, असेही विद्या देवधर यांनी सांगितले.
या संमेलनाचे उद्घाटक जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलेच्या हस्ते होणार असल्याने यावर भाषण असणार आहे. यामुळे या संमेलनाच्या व्यासपीठावरून जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांची जगाच्या पातळीवर नोंद होऊन त्या रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येईल, हे या भाषणातून दिसून येणार आहे.

Post a Comment