0
पुणे :

जम्मू आणि काश्मीरमध्ये राजौरी जिल्ह्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ काल (ता. ११) झालेल्या इम्प्रुवाइज्ड एक्स्प्लोझिव्ह डिव्हाइसच्या (आयईडी) स्फोटात पुण्यातील मेजर शशी नायर शहीद झाले. वयाच्या अवघ्या ३३व्या वर्षी नायर यांना वीरमरण आले. नायर यांचे पार्थिव विमानाने पुण्यात आणण्यात येणार आहे. नायर गेल्या ११ वर्षांपासून ते सैन्यात कार्यरत होते.

मेजर नायर पुणे शहरातील खडवासला परिसरात वास्तव्यास होते. राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमधील रूपमती आणि पुख्खरणी या ठिकाणी शुक्रवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी नियंत्रण रेषेजवळ पेरुन ठेवलेल्या आयईडीचा स्फोट झाला. या स्फोटांमध्ये मेजर नायर शहीद झाले. मेजर नायर यांच्यासह एका जवानही आयईडी स्फोटात शहीद झाला.

Post a Comment

 
Top