विरार :
वैतरणा रेल्वे स्थानकात एका ७ वर्षीय मुलाच्या शाळेच्या बॅगेत ६ लाख ४८ हजार ७२० रूपये सापडल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. रेल्वे पोलिसांच्या मदतीने ही रक्कम त्याच्या पालकांना सुपूर्द करण्यात आली.
वैतरणा रेल्वे स्थानकात एका ७ वर्षीय मुलाच्या शाळेच्या बॅगेत ६ लाख ४८ हजार ७२० रूपये सापडल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. रेल्वे पोलिसांच्या मदतीने ही रक्कम त्याच्या पालकांना सुपूर्द करण्यात आली.
नसीर रझाक खान हा नालासोपारामध्ये राहणारा ७ वर्षीय चिमुरडा शुक्रवारी रात्री १० वाजता आपल्या वडिलांसोबत बांद्रा येथे गेला होता. तेथून घरी परतताना गर्दीमुळे नासीर हा ट्रेन मध्येच अडकला व वैतरणा रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक १ वर बसला होता. रात्रीच्या सुमारास स्थानकात त्याला एकटा पाहून तुषार पाटील व मनीष रकटे या दक्ष प्रवाशांनी त्याची विचारपूस केली असता, त्यांना त्याच्या बॅगेत ही मोठी रक्कम आढळली.
दरम्यान दोन्हीही दक्ष नागरिकांनी रेल्वे पोलिसांना याबाबत माहिती दिली. वसई रेल्वे पोलिसांनी नजीर जवळील रक्कम ताब्यात घेत त्याच्या पालकांशी संपर्क साधत या मुलासह ही रक्कम त्याच्या पालकांकडे सुपूर्द केली.
रेल्वे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नजीरच्या वडिलांचा केटरिंगचा व्यवसाय आहे, त्याचे पेमेंट घेण्यासाठी दोघेही बांद्रा येथे गेले होते. ट्रेनमध्ये
गर्दी असल्याने त्याच्या वडिलांनी नजीरच्या बॅगेत ही रक्कम ठेवली होती. दक्ष नागरिकांच्या मदतीमुळे नजीर व सोबत असलेली रक्कम सुखरूप पालकांना मिळाली.

Post a Comment