0
मुंबई :

माजी खासदार प्रिया दत्त यांनी मुंबईच्या उत्तर मध्य मतदारसंघातून आगामी लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे मंगळावारी जाहीर केले. इतकेच नव्हे तर त्यांनी राजकारणातून निवृत्त होत असल्याचेही सांगितले.प्रिया दत्त यांनी यामागील कारणदेखील स्पष्ट केले आहे. एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना त्या म्हणाल्या, की आपण आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाही.

व्यक्तिगत जीवन आणि राजकीय क्षेत्र या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळणे अवघड जात आहे. त्यामुळे मी २०१९ ची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. राजकारणापलीकडेही माझे आयुष्य आहे. मला आता माझ्या व्यक्तिगत जीवनाकडे लक्ष द्यायचे आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच त्या पुढे म्हणाल्या, पक्षाने जी कामे माझ्यावर सोपवली होती, ती मी चांगल्याप्रकारे हाताळण्याचा प्रयत्न केला आहे.

मी निवडणूक न लढवता लोक सेवा करू शकते. निवडणूक लढवल्यावरच लोकांची सेवा करू शकतो. यावर माझा विश्वास नाही, असेही त्यांनी नमूद केले आहे.

वाचा : लोकसभा २०१९ : प्रिया दत्त यांचा पत्ता कट; नगमांना संधी?

दत्त यांनी आपला निर्णय काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना ईमेलद्वारे कळवला आहे. प्रिया दत्त या उत्तर-मध्य मुंबईतून २००४ आणि २००९ असे दोनदा लोकसभेवर निवडून आल्या आहेत. मात्र २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत प्रिया यांना भाजपच्या पुनम महाजन यांच्याकडून धक्‍कादायक पराभवाला सामोरे जावे लागले होते. प्रिया यांना वडील सुनील दत्त यांच्याकडून राजकीय वारसा मिळाला आहे.

Post a comment

 
Top