0
लखनऊ :

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर समाजवादी आणि बहुजन समाज पक्ष यांच्यात शनिवारी महाआघाडीची घोषणा झाल्यानंतर लगेच रविवारी काँग्रेसनेही उत्तर प्रदेशातील सर्व ८० जागा लढविणार असल्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे काँग्रेसने भाजपला टक्कर देण्यासाठी उत्तर प्रदेशात स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचे म्हटले आहे.


मात्र, भाजप विरोधातील जर कोणताही धर्मनिरपेक्ष पक्षाने युतीसाठी हात पुढे केला आहे, त्यांच्यासाठी काँग्रेसचा दरवाजा खुला आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. काँग्रेसचे सरचिटणीस आणि उत्तर प्रदेशचे प्रभारी गुलाम नबी आझाद यांनी ही माहिती दिली आहे.

उत्तर प्रदेशात सपा, बसपा आणि काँग्रेस महाआघाडी करणार होते. मात्र, काँग्रेसला बाजूला ठेवत सपा- बसपाने आघाडी केली. त्यानंतर लगेच काँग्रेसने एकट्याने स्वबळावर सर्व जागा लढविण्याची घोषणा केली. 

उत्तर प्रदेशात काँग्रेसने २००९ मधील लोकसभा निवडणुकीत २१ जागा जिंकल्या होत्या. आता आगामी निवडणुकीत या तुलेनत दुपटीने जागा जिंकू, अशी आशा आझाद यांनी व्यक्त केली आहे.

आम्हाला उत्तर प्रदेशात भाजप विरोधात महाआघाडी झालेली हवी आहे. मात्र,  कोणाला ही महाआघाडी नको असेल, तर काही होणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. सपा- बसपाच्या आघाडीवर बोलताना ते म्हणाले की, राष्ट्रीय पातळीवर  सर्व धर्मनिरपेक्ष पक्षाचे काँग्रेस स्वागत करत आहे.  
Post a Comment

 
Top