जायखेडा (नाशिक) - करंजाडच्या (ता. बागलाण) खैरओहोळ शिवारात कांदा उत्पादक तरुण शेतकऱ्याने बुधवारी (ता. २३) सायंकाळी शेतातच विष प्राशन करून आत्महत्या केली. तालुक्यात एकाच महिन्यात दोन शेतकऱ्यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याने चिंता व्यक्त होत आहे.
एकनाथ गोविंद चित्ते (वय २८) असे या शेतकऱ्याचे नाव असून, तो अविवाहित होता. सततची नापिकी आणि हातउसनवार व बॅंकेचे कर्ज कसे फेडायचे, या विवेचनात सापडलेल्या एकनाथने खैरओहोळ शिवारातील आपल्या शेतातच विष प्राशन केले.
कांदा सत्तर पैसे किलो
चाळीत साठवून ठेवलेला १९ क्विंटल कांदा एकनाथने ११ जानेवारीला नामपुर बाजार समितीत विक्रीसाठी नेला असता, या कांद्याला किलोला सत्तर पैसे असा भाव मिळाला. त्यातून वाहतूक भाडेही पदरी न पडल्याने तो हताश झाला होता. शिवाय चाळीतील पडून असलेल्या तीस ते चाळीस क्विंटल कांद्याला कोंब फुटू लागले. त्यातच एक ते सव्वा एकरावर नव्याने कांदा लागवड केली आहे. पाण्याअभावी या पिकानेही मान टाकल्याने एकनाथ चिंतेत होता.

Post a Comment