0
दिव्य मराठी’ने पर्दाफाश केला तो एका गुन्हेगारी टोळीचा, पण, त्या मानसिकतेचे काय करणार?

औरंगाबाद- 'दिव्य मराठी'च्या सापळ्यात हा गुन्हेगार सापडला. पण, 'स्टिंग ऑपरेशन' फत्ते झाल्याचा आनंद आम्हाला झाला नाही. उलटपक्षी दुःखच झाले. शंका खोटी ठरावी, अशी आमची इच्छा होती. मात्र, हा डॉक्टर सापळ्यात सापडला आणि माणूस असल्याचीच लाज वाटली. असे मत 'दिव्य मराठी'चे संपादक संजय आवटे यांनी व्यक्त केले.
रवींद्रनाथ टागोर म्हणाले होते, जन्माला येणारं प्रत्येक बाळ म्हणजे मानवजातीबद्दलची आशा अद्यापही परमेश्वरानं सोडली नसल्याचा पुरावाच जणू! पण, त्या आशेचंही जे लिंग तपासतात, अशा मानसिकतेचं काय करायचं? गर्भातच मुलींना मारून टाकणारी मानसिकता आजही जिवंत आहे. औरंगाबादसारख्या मोठ्या शहरात एक डॉक्टर राजरोसपणे गर्भलिंग निदान करतो. आणि, गर्भ मुलीचा असेल, तर पुढे भ्रूणहत्या होऊ शकते. माहिती अशी आहे की, यामध्ये एक मोठी टोळी गुंतलेली आहे. हितसंबंधांच्या या साखळीत जसा हा बीएचएमएस डॉक्टर आहे, तसेच इतर काही डॉक्टर, हॉस्पिटल्स आहेत. त्यात महिलाही आहेत. या व्यापारातून मालामाल होणा-या नराधमांना माणूस तरी कसे म्हणायचे?

ज्या गर्भवती महिला गर्भलिंगनिदान करुन घेण्यासाठी यायच्या, त्यांच्यापैकी अनेक अगतिक असतील. आमच्या बातमीदारांचे निरीक्षण असे की, निदान करुन जाताना आपल्या गावापर्यंत अथवा घरापर्यंत पोहोचण्यासाठी पुरेसे पैसेही त्यांच्याकडे नसत. मात्र, या डॉक्टरचा खिसा गरम होत असे. मुलगा हवा, या हट्टासाठी दहा-दहा बाळंतपणं महिलांवर लादली जातात. आणि, त्यात त्या मरण पावतात, अशा बातम्या एकविसाव्या शतकात उमटाव्यात, याला काय म्हणावे? ‘मुलगा’ जन्माला घालणारे मशीन म्हणून जिथे महिलांकडे पाहिले जाते, तिथे यापेक्षा वेगळे काय घडावे?
Sting operation is done but we are sad; syas State editor Sanjay Awte

Post a Comment

 
Top