0
टीम इंडियाच्या विराट सेनेने तब्बल ७२ वर्षांचा दुष्काळ संपविताना ऑस्ट्रेलियात चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-१ ने विजय मिळवताना इतिहास रचला. भारताला तब्बल ७२ वर्षांची ऑस्ट्रेलियात तिरंगा झळकाविण्यासाठी वाट पाहावी लागली. भारताच्या मालिका विजयाचे शिल्पकार चेतेश्वर पुजारा आणि वेगवान गोलंदाज ठरले.

अधिक वाचा : INDvsAUS:विराट सेनेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियात पहिला मालिका विजय

जाणून घ्या : भारताचे ऑस्ट्रेलिायतील आतापर्यंतचे कसोटी मालिका रेकॉर्ड

१९४७/४८ : ( कर्णधार लाला अमरनाथ) ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाचा ४-० ने विजय

१९६७/६८ : (कर्णधार चंदू बोर्डे/ मन्सूर अली खान पतौडी) ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाचा ४-० ने विजय

१९७७/७८ : (कर्णधार बिशनसिंग बेदी) पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाचा ३-२ ने विजय

अधिक वाचा :  नांगर टाकण्यात द्रविड ‘शेर’ तर पुजारा ‘सव्वाशेर’

१९८१/८२ : (कर्णधार सुनील गावसकर) ३ सामन्यांची कसोटी मालिका १-१ ने अनिर्णित

१९८५/८६ : (कर्णधार कपिल देव) ३ सामन्यांची मालिका ०-० ने अनिर्णित

१९९१/९२ : (कर्णधार महंमद अझहरुद्दीन) ऑस्ट्रेलियाचा ४-० ने विजय 

अधिक वाचा : जे धोनीला जमले नाही ते पंतने केले

१९९९/०० : (कर्णधार सचिन तेंडुलकर) ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलिया ३-० ने विजय

२००३/०४ : (कर्णधार सौरभ गांगुली) ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-१ ने बरोबरी

२००७/०८ : (कर्णधार अनिल कुंबळे)  ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलिया २-१ ने विजय

अधिक वाचा :  कसोटीतला ‘सायलेंट किलर’ पुजारा 

२०११/१२ : (कर्णधार महेंद्रसिंह धोनी) ४ कसोटी सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलिया ४-० ने विजय 

२०१४/१५ : ( कर्णधार महेंद्रसिंह धोनी/ विराट कोहली) ऑस्ट्रेलिया २-० ने विजय

२०१८/१९ : (कर्णधार विराट कोहली) ४ सामन्यांच्या मालिकेत भारत २-१ ने विजय 

Post a comment

 
Top