0
५३२ कामे अपूर्ण निधी खर्चात आमदार डॉ. सतीश पाटील आघाडीवर

जळगाव - जिल्हा नियोजन समितीकडून जिल्ह्यातील १३ आमदारांना देण्यात आलेल्या निधीपैकी ४८.५३ टक्के निधी खर्च झाला आहे. मतदारसंघात निधी खर्च करण्यात आमदार डॉ. सतीश पाटील, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह संजय सावकारे हे आघाडीवर आहेत.



जिल्हा नियोजन समितीतर्फे जिल्ह्यातील ११ विधानसभा सदस्यांसह दोन विधान परिषद सदस्यांना प्रत्येकी दोन कोटी व सर्व आमदारांना २६ कोटी रुपयांचा निधी देण्यात येतो. एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ साठी शासनाने जिल्हाधिकाऱ्यांकडे आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत २७ कोटी १९ लाख १३ हजार रुपयांचा निधी वितरित केलेला आहे. १७ कोटी ७१ लाख १३ हजार एवढे अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे. गेल्या वर्षीची सर्व आमदारांची एकूण ५३२ कामे अपूर्ण आहेत. या अपूर्ण कामांसाठी ८ कोटी २८ लाख ८७ हजार रुपयांचा निधी लागणार आहे. आमदार किशोर पाटील यांच्या भडगाव-पाचोरा मतदारसंघात सर्वाधिक ५५ कामे अपूर्ण आहेत. चोपडा मतदारसंघ ४२, जामनेर मतदारसंघ ३८, जळगाव शहर ३५, जळगाव ग्रामीण ५२, एरंडोल मतदारसंघ २२, अमळनेर मतदारसंघ ४५, चाळीसगाव मतदारसंघ ४२, भुसावळ मतदारसंघ ११, मुक्ताईनगर मतदारसंघ ३० व रावेर मतदारसंघातील ३९ कामे अपूर्ण आहेत. विधान परिषद सदस्य चंदुलाल पटेल यांची ६४ तर स्मिता वाघ यांच्या निधीतील ५७ कामे अपूर्ण आहेत. सर्व आमदारांनी मिळून जिल्ह्यात १६ जानेवारी अखेर १६८ कामे पूर्ण केली आहेत.

सुमारे १४ कोटी ७४ लाखांच्या ५४६ कामांना प्रशासकीय मंजुरी
चालू वर्षात १४ कोटी ७३ लाख ९६ हजार रुपये अंदाजित किमतीच्या ५४६ कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. त्यामध्ये एरंडोल मतदारसंघात सर्वाधिक १ कोटी ७८ लाख ९० हजार रुपयांच्या कामांचा समावेश आहे. चाळीसगाव मतदारसंघात १ कोटी ७५ लाख ३० हजार, भुसावळ मतदारसंघात १ कोटी ५८ लाख ७२ हजार, जळगाव ग्रामीण १ कोटी ७ लाख ९४ हजार, रावेर १ कोटी २६ लाख, चोपडा मतदारसंघ ५ लाख २४ हजार, जामनेर मतदारसंघ ३० लाख १४ हजार, जळगाव शहर ६८ लाख ४२ हजार, अमळनेर मतदारसंघ ७२ लाख ३६ हजार, पाचोरा-भडगाव मतदारसंघ ९० लाख ४७ हजार, मुक्ताईनगर ५० लाख ३० हजार.

आमदार सोनवणे, खडसे यांच्या खर्चाची टक्केवारी सर्वात कमी
एरंडोलचे आमदार डॉ. सतीश पाटील यांनी ८४.८० टक्के निधी खर्च केला. आमदार संजय सावकारे ७४.९६, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील ७३.४३, आमदार उन्मेष पाटील ६९.३९, आमदार हरिभाऊ जावळे ५५.३, आमदार किशोर पाटील ४६, आमदार शिरीष चौधरी ४४.८९, आमदार सुरेश भोळे २१.५२, जलसंपदामंत्री गिरीश महाजन २२.३०, आमदार एकनाथ खडसे ६.९८ तर आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या निधी खर्चाची टक्केवारी ४.४९ टक्के आहे. विधान परिषद सदस्य चंदुलाल पटेल यांचा ७४.२३ टक्के तर स्मिता वाघ यांना आतापर्यंत प्राप्त अनुदानाच्या खर्चाची टक्केवारी ५३.१४ टक्के आहे.

Post a Comment

 
Top