0
मुंबई - मध्य प्रदेशात धावत्या रेल्वेत कटरच्या साह्याने बॅग कापून झालेल्या दीड कोटी रुपयांच्या सोन्याची चोरी अखेर बनावच निघाला. तक्रारदारानेच मोठ्या शिताफीने रेल्वेत बसण्यापूर्वीच दोन साथीदारांच्या मदतीने सोने लंपास करून चोरी झाल्याचा बनाव केला होता. अखेर याप्रकरणी लोकमान्य टिळक (एलटी) मार्ग पोलिसांनी आरोपी नोकराला अटक केली आहे. संशयिताकडून तीन किलो (एक कोटी १५ लाख रुपये) सोने हस्तगत करण्यात आले आहे.
अटक आरोपी पंकज भवरलाल कटारिया (३७) भाईंदर पश्‍चिमेतील रहिवासी आहे. तो मे २०१८ पासून धनश्री स्ट्रीटमधील कल्पना ज्वेलर्सचे मितेश राठोड यांच्याकडे सोन्याचे दागिने ने-आण करण्याचे काम करायचा. राठोड मध्य प्रदेश व गुजरातमधील किरकोळ सोने व्यापाऱ्यांना सोन्याचे दागिने बनवून विकतात. डिसेंबर महिन्यात त्यांना मध्य प्रदेशातील पाच सराफांनी अंगठी, सोनसाखळी, ब्रेसलेट आणि कर्णफुले अशा एकूण एक कोटी ३० लाख रुपयांची मागणी त्यांच्याकडे नोंदवली होती. १८ डिसेंबरला दुपारी सुमारास राठोड यांनी सर्व माल कटारियाकडे सुपूर्द केला. त्याच्यासोबत एक मदतनीसही जाणार होता. दोघेही सीएसएमटी रेल्वेस्थानकावरून पंजाब मेलने जाण्यास निघाले. १९ डिसेंबरला पाडावेचा मिसकॉल आला. त्यामुळे राठोड याने त्याला दूरध्वनी केला असता दागिने चोरी झाल्याचे पाडावे व कटारिया यांनी सांगितले होती.

अशी झाली उकल
पंकज कटारिया याने इटारसी रेल्वे पोलिस ठाण्यात रेल्वेत दीड कोटीच्या सोन्याच्या चोरीची तक्रार केली होती. त्यानुसार स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता; पण मितेश राठोड चोरीबाबत संशय आल्यामुळे त्यांनी एलटी मार्ग पोलिस ठाण्यात तक्रार केली अन्‌ गुन्हा उघड झाला.

Post a Comment

 
Top