0
नवी दिल्ली : 

देशात पेट्रोल, डिझेलची दरवाढ सलग सहाव्या दिवशी कायम राहिली. दिल्लीत मंगळवारी (दि.१५) पेट्रोल ०.२८ पैशांनी वाढून प्रतिलिटर ७०.४१ रुपयांवर पोहचले. तर डिझेल ०.२९ पैशांनी महागले असून ते प्रतिलिटर ६४.४७ रुपयांवर गेले आहे.


तर मुंबईतही पेट्रोल ०.२८ पैशांनी वाढून प्रतिलिटर ७६.०५ रुपये झाले आहे. या ठिकाणी डिझेल ०.३१ पैशांनी वाढून ६७.४९ रुपये झाले आहे. देशातील इतर भागातही दरवाढ झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेल्याच्या किमती कमी झाल्यानंतर देशातील पेट्रोल- डिझेलचे दर कमी झाले होते. मात्र, आता नव्याने दरवाढीची मालिका सुरू झाली आहे. याचा फटका वाहनचालकांना बसत आहे.



Post a Comment

 
Top