कांदिवलीमधील गणेश नगर भाजी मार्केटमध्ये सोमवारी (ता.7) ही घटना घडली आहे.
मुंबई- कांदिवली परिसरात एका भाजी विक्रेत्यावर जीवघेणा हल्ला झाल्याचे समोर आले आहे. या हल्ल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. भाजी विक्रेत्यावर जवळपास डझणभर लोक चाकू, तलवारीने हल्ला करताना दिसत आहेत. कांदिवली पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कांदिवलीमधील गणेश नगर भाजी मार्केटमध्ये सोमवारी (ता.7) ही घटना घडली आहे. काही अज्ञात लोकांनी गोलू नामक भाजी विक्रेत्यावर हल्ला केला. या घटनेनंतर परिसरात तनाव निर्माण झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
भाजी विक्रेता गोलू गंभीर जखमी झाला असून त्याला शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.

Post a Comment