0
राजपट काँग्रेस नेते परमेश्वर यांची कबुली- संकट ओढवण्यामागे काँग्रेसही काहीअंशी जबाबदार

बंगळुरू- कर्नाटकातील राजकीय नाट्याचे दररोज नवनवीन प्रयोग पाहायला मिळू लागले आहेत. सुरुवातीला भाजप 'ऑपरेशन लोटस'च्या माध्यमातून सरकार पाडण्याच्या प्रयत्नात असल्याचा काँग्रेसने आरोप केला होता. मात्र गुरुवारी काँग्रेस नेतृत्वात सर्वकाही आलबेल नसल्याचे दिसून आले. या सर्व घडामोडींमागे काँग्रेसचे ज्येष्ठ नेतेच जबाबदार आहेत. मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी स्वत: पुढाकार घेऊन काँग्रेसमधील असंतुष्ट आमदारांशी चर्चा केली. गेल्या चार दिवसांपासून कुमारस्वामी दिल्लीतील काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात आहेत. त्याशिवाय काँग्रेसच्या नाराज आमदारांची मनधरणीही करू लागले होते. या मनधरणीत कुमारस्वामी यशस्वीदेखील झाले.

गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्यामागे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या व जलसंधारणमंत्री डी.के. शिवकुमार यांच्यातील संघर्ष कारणीभूत ठरला आहे, असे मानले जाते. सिद्धरामय्या हे काँग्रेसचे संसदीय पक्षाचे नेते आहेत, तर शिवकुमार यांची पक्षांतर्गत संकटमोचक अशी प्रतिमा आहे. दोन्ही नेत्यांत कॅबिनेट तसेच विविध महामंडळांवरील पदांवरून धुसफूस आहे. त्यांच्यातील बेबनावामुळेच संघर्ष उफाळला.राजकीय संकटामागे भाजपला जास्त दोषी आहे, असे म्हणता येणार नाही. कारण भाजपला केवळ संधी दिसून आली आणि त्यांनी परिस्थितीनुसार प्रतिक्रिया दिली, असे एका मंत्र्याने सांगितले. काँग्रेस नेते व उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांनीही काँग्रेसला काहीअंशी दोषी धरावे लागेल. मंत्रिपद न मिळालेल्यांनी वेगवेगळ्या स्वरूपात नाराजी व्यक्त केली आहे. अशा नाराजांना सरकारमध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करू. कुमारस्वामी एखाद्या पक्षाचे नव्हे, तर राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळेच ते आमदारांच्या संपर्कात होते.

आमदाराचा दावा : भाजपने ६० कोटींची ऑफर दिली
जेडीएस आमदार के. एम. शिवलिंगे गौडा यांनी केलेल्या दाव्यानुसार, जेडीएसच्या एका व्यक्तीला माजी मुख्यमंत्री व भाजप नेते जगदीश खट्टरनी ६० कोटी रु. व मंत्रिपदाची ऑफर दिली होती. त्यांनी ऑफर नाकारली व सीएम कुमारस्वामींना याची माहिती दिली. सीएम कुमारस्वामी यांनी म्हटले की, स्थिती नियंत्रणात आहे

भाजपचे १०२ आमदार बंगळुरूला जाणार
भाजपचे १०४ पैकी १०२ आमदार सध्या दिल्लीच्या रिसॉर्टमध्ये थांबले आहेत. काँग्रेस विधिमंडळ गटाच्या बैठकीनंतर भाजप आमदार गुरूग्रामहून बंगळुरूला येतील. येदियुरप्पा यांनी त्याला दुजोरा दिला. ते म्हणाले, ते सर्व शुक्रवारपर्यंत परत येतील. कुमारस्वामीच फोडाफोडी करत आहेत, असे येदियुरप्पा म्हणाले.

भाचा आकाशला मायावतींनी आणले बसपमध्ये
बसप अध्यक्ष मायावती यांनी भाचा आकाशला पक्षात प्रवेश दिला. गुरुवारी त्यांनी यासंबंधी घोषणा केली होती. मायावती म्हणाल्या, भविष्यात आकाश आनंदला बसपत खूप काही शिकायला मिळेल. त्यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर हल्ला चढवत सीबीआय व प्राप्तिकर खात्याचा दुरुपयोग करत असल्याचे म्हटले आहे. माझा भाचा पक्षाच्या सर्व कामांत भाग घेईल. मी घाबरणारी नाही, मी कांशीराम यांची शिष्या आहे. २४ वर्षीय आकाश मायावती यांचा लहान भाऊ आनंद यांचा मुलगा आहे.

बंगळुरूमध्ये आज काँग्रेस विधिमंडळाची बैठक
काँग्रेसने बंगळुरूत शुक्रवारी आमदारांची बैठक बोलावली. बैठकीस गैरहजर राहणाऱ्यांनी पक्ष सदस्यत्व सोडल्याचे ग्राह्य धरले जाईल, असा इशारा काँग्रेसने दिला आहे. दिल्लीकडून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगेही उपस्थित राहतील. खरगे म्हणाले, भाजप तोडफोड करून सरकार स्थापनेचा प्रयत्न करत आहे.Operation Lotus not interfere  in Karnataka; says Congress leader Parmeshwar

Post a Comment

 
Top