लातूर:
येथील एका इमारतीवर जाऊन एका अल्पवयीन मुलीनेआत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी रात्री नऊ वाजतह हा प्रकार उघडकीस आला. काही वेळातच मुलीला पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतले.औसा रोडवर क्रीडा संकुलासमोर पाच मजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. तेथील सुरक्षारक्षकाची नजर चुकवून त्या इमारतीवर १७ वर्षीय मुलगी वर गेली. यानंतर काही वेळातच ती जोर जोराने आत्महत्या करण्याची धमकी देऊ लागली. रस्तावरून ये -जा करणाऱ्या नागरिकांनी हा प्रकार पहिला व त्यांनी तेथून जवळ असलेल्या शिवाजीनगर पोलिसांना ही माहिती देण्यात आली.
मुलगी इमारतीवर असतानाच पोलिस घटनास्थळी पोहचले.अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. पोलिसांनी मुलीस ताब्यात घेतले तिची समजूत काढली. दरम्यान घटनास्थळी बघ्यांची गर्दी उसळल्याने औसा रोडवर तब्बल दीड तास वाहतूक खोळंबली होती. सदर मुलगी ही औसा रोडवरील शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी असल्याचे समजते. तिच्या या आत्महत्या करण्याचे कारण अद्याप कळू शकले नाही.

Post a Comment