कोल्हापूर :
जेष्ठ पुरोगामी नेते कॉ. गोविंद पानसरे हत्येप्रकरणी एसआयटीने अटक केलेल्या अमित रामचंद्र डेगवेकर याला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले.
डेगवेकर हा सिंधुदुर्गमधील आहे. त्याला बंगळूर मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेण्यात आले होते. आतापर्यंत पानसरे हत्या प्रकरणी ७ जणांना अटक झाली आहे. जेष्ठ पत्रकार गौरी लंकेश, जेष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी डेगवेकर याला यापूर्वीच अटक केली आहे. पानसरे हत्येच्या कटात त्याचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे एसआयटीच्या चौकशीत निष्पन्न झाले होते.
बंगळूर न्यायालयाच्या परवानगीनंतर तपास पथकाने डेगवेकरचा ताबा घेतला. त्याला मंगळवारी कोल्हापुरात आणल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले.

Post a Comment