0
मुंबई :

विविध मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सलग चौथ्या दिवशी शुक्रवारी (दि.११) सुरूच आहे. बेस्टच्या वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या संपाला विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांसह सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे.
बेस्टमध्ये व्यवस्थापनातर्फे चालू असलेली दडपशाही घराबाहेर काढण्यासाठी बजावण्यात आलेल्या नोटीस, कर्मचा-यांना ( मेस्मा ) लावण्याची कारवाई  याचा सेवानिवृत्त कर्मचार्यांनी जाहीर निषेध केला आहे. कर्मचा-यांच्या मागण्या योग्य असून पाच वर्षे सेवानिवृत्त होऊनही आमची थकबाकी दिलेली नाही. त्यामुळे या संपास आमचा पूर्ण पाठिंबा असून वेळ पडल्यास रस्त्यावरती उतरून आंदोलन केले जाईल, असा इशारा सेवानिवृत्त कर्मचारी शाम कदम, प्रदीप म्हस्के, साहेबराव शिंदे यांनी दिला आहे. 
दरम्यान, गुरुवारी (दि.१०) उशिरापर्यंत महापौर बंगल्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महापालिका आयुक्‍त अजोय मेहता यांच्यासोबत चाललेली बैठक निष्फळ ठरली आणि बेस्ट कामगारांचा संप सुरूच राहणार असल्याचे कामागार नेते शशांक राव यांनी जाहीर केले. परिणामी, मुंबईकरांची वाहतूक कोंडी सुटण्याची कोणतीही आशा नाही. बेस्ट संपाने आता चौथ्या दिवसांत पदार्पण केले असून, सर्वत्र प्रवाशांचे हाल सुरू आहेत. 

Post a Comment

 
Top