0
गोणीत चितळ हरणाची लहानमोठी एकूण २२ शिंगे आढळली.

मुक्ताईनगर- तालुक्यातील वढोदा वनपरिक्षेत्रातील डोलारखेडा वनहद्दीत डोलारखेडा गावाजवळील नाल्याकाठी एक गोणी असल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली होती. त्यानुसार सोमवारी दुपारी जळगाव येथील गस्तीपथकाचे पाहणी केली. गोणीत चितळ हरणाची लहानमोठी एकूण २२ शिंगे आढळली.



वनक्षेत्रपाल धनंजय पवार, वढोद्याचे वनक्षेत्रपाल अमोल चव्हाण, वनपाल पी.टी.पाटील, आर.एस.ठाकरे, गणेश कोळी, रहीम तडवी, डी.एम धुळगुंडे, प्रीतम कोळी, महेंद्र पूरकर यांच्या पथकाने डोलारखेड्याजवळील नाल्याजवळ पाहणी केली. एका गोणीत चितळ हरणाची २२ शिंगे आढळून आली. याप्रकरणी वन्यजीव अधिनियम १९७२ नुसार अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल झाला, अशी माहिती आरएफओ धनंजय पवार यांनी दिली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. सोमवारी वढोदा वनहद्दीतील थेरोळा शिवारात विजय कानडे यांचा लहान रेडा बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना घडली. नुकसानग्रस्ताला भरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.


जप्त केलेल्या शिंगांसह आरएफओ धनंजय पवार, यांच्यासह वनकर्मचारी.
गुप्त माहितीनुसार गस्ती पथकानेे केली पाहणी, अज्ञाताविरुद्ध गुन्हा


Post a Comment

 
Top