0
माऊंट मुनगुणई : 

भारतीया पुरूष संघाने  न्यूझीलंडविरुद्ध सुरु असलेल्या वनडे मालिका जिंकल्यानंतर भारतीय महिला संघालादेखील किवींना हारवण्याची संधी मिळाली आहे. भारतीय महिला संघाने दुसाऱ्या एकदिवसीय सामन्यात किवींना १६१ धावात गुंडाळले आहे.


भारतीय महिला संघाने न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार मिताली राजचा हा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवत न्यूझीलंडच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. पहिल्याच षटकात झुलन गोसवामीने सुझी बेटला बाद करत किवींना पहिला धक्का दिला. त्यानंतर शिखा पांडेने किवींची दुसरी सलामीवीर सोफी डेव्हिनला ७ धावांवर माघारी धाडले.

डावखुरी फिरकी गोलंदाज एकता बिष्ट जलदगती गोलंदाजांनी सुरुवातीला दिलेल्या धक्यातून किवींना सावरु दिले नाही. तिने डाव सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या लॉरने डॉव्हनचा अडथला दूर केला. पाठोपाठ अमेलिया केरलाही अवघ्या एक धावांवर माघारी धाडले. बिष्ट पाठोपाठ लेग स्पिनर पुनम यादवनेही आपल्या फिरकीचा जलवा दाखवत मॅडी ग्रीनला बाद करत किवींना पाचवा धक्का दिला.

त्यानंतर कर्णधार एमीने झुंझार फलंदाजी केली. तिच्या ७१ धावांच्या जिवावर किवींनी १६१ धावा केल्या पंरतु दुसऱ्या फलंदाजांकडून साथ मिळाली नाही. भारताकडून वेगवान गोलंदाज झुलन गोसवामीने किवींचे ३ बळी घेतले असुन एकता बिष्ट, दिप्ती शर्मा, पुनम यादव या तिघींनी प्रत्येकी २ बळी टिपले, तर शिखा पांडेने एक बळी घेतला अशा प्रकारे किंवीच्या सर्व महिला फलंदाजाना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

Post a Comment

 
Top