0
अंनिसचे राज्य प्रधान सचिव मिलिंद देशमुख यांनी सांगितले की, या प्रकरणात दाेषाराेपपत्र दाखल न हाेता मुदतवाढ घेतली जात आहे.

मुंबई- गौरी लंकेश हत्या किंवा अन्य प्रकरणांतील तपासावर विसंबून न राहता नरेंद्र दाभोलकर व गोविंद पानसरे हत्या प्रकरणाचा स्वतंत्र तपास करा, असे निर्देश मुंबई न्यायालयाने गुरुवारी दिले. या हत्या प्रकरणातील फरार आरोपींना पकडण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न व्हायला हवेत, असेही नमूद केले.

गौरी लंकेश प्रकरणातील आरोपींची चौकशी सुरू असताना दाभोलकर व पानसरे हत्या प्रकरणी चौकशी सुरू असल्याचे सीबीआय आणि एसआयटी वारंवार सांगत आहे. परंतु, कर्नाटकात गौरी लंकेश यांच्या हत्येपूर्वी दाभोलकर व पानसरे यांची हत्या महाराष्ट्रात झाली असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले.

सीबीआयने सुधरावे
अंनिसचे राज्य प्रधान सचिव मिलिंद देशमुख यांनी सांगितले की, या प्रकरणात दाेषाराेपपत्र दाखल न हाेता मुदतवाढ घेतली जात आहे. सीबीआयच्या चुकांमुळे आराेपींना जामीन मिळत आहे. न्यायालयाने फटकरल्यानंतर तरी सीबीआयने आता सुधरावे.Narendra Dabholkar Murder case: Mumbai high court says take instant action dont depend on the investigation report of Gauri Lankesh Murder case 

Post a Comment

 
Top