0
कोरेगाव :
तारगाव ते वाठार (किरोली) मार्गावर विनापरनावा वाळू वाहतूक  करणार्‍या डंपरवर कारवाई करण्यात आली असून, दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयाने दि. 21 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. उपविभागीय पोलिस अधिकारी प्रेरणा कट्टे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शुक्रवारी रात्री ही कारवाई केली.


शहाजी उद्धव घाडगे (वय 35,  रा. धोंडेवाडी, ता. सातारा) व जितेंद्र प्रकाश घाडगे (वय 38, रा कामेरी, ता. सातारा) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. तारगाव ते वाठार (किरोली) मार्गावर विनापरनावा व चोरटी वाळू वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी  प्रेरणा कट्टे यांनी स्वत: पोलिस पथकासह टेहळणी सुरु केली होती. शुक्रवारी रात्री ते या मार्गावर पेट्रोलिंग करत असताना डंपरमधून विनापरवाना व चोरटी वाळू वाहतूक होत असल्याचा संशय आला. त्यांनी संबंधित डंपर चालकाकडे परवान्याची मागणी केली. त्यावेळी कोणताही परवाना नसल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार पोलिसांनी डंपर जप्त करुन शहाजी घाडगे व जितेंद्र घाडगे यांना अटक केली. याप्रकरणी रहिमतपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  तपास हवालदार उमाकांत नायकवडी करत आहेत

Post a comment

 
Top