लासलगांव :
राज्य सरकार कांदा अनुदान देण्याची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत करणार असल्याची घोषणा राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केली आहे. शेतकऱ्यांना कांदा अनुदान मिळण्याकरता आणखी पंधरा दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.
कांदा अनुदान योजनेची घोषण करताना राज्य शासनातर्फे १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०१८ या कालावधीत विक्री केलेल्या कांद्याला अनुदान देण्याचे जाहीर केले होते. मात्र, आता यात ३१ डिसेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत विक्री केलेल्या कांद्याला प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान मिळणार आहे.
कांद्याचे दर पडल्याने अडचणीत सापडल्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान देण्यासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून अर्ज स्वीकारले जात आहे. यापूर्वी अनुदान अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ जानेवारीपर्यंत देण्यात आली होती. मागील आठवड्यात मुदतवाढ देऊन ती आता २५ जानेवारीपर्यंत करण्यात आली आहे. प्रशासनातर्फे शेतकऱ्यांना २०० क्विंटल मर्यादेपर्यंत प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान दिले जाणार आहे.

Post a Comment