0
'ओम शांती ओम' चित्रपट २००६ मध्ये प्रदर्शित झाला आणि भारतीय सिनेमाला डोळे दिपवणारं स्वप्न पडलं ते म्हणजे अभिनेत्री दीपिका पादुकोण हिचं. शाहरूख आणि दीपिका यांची जुळलेली केमिस्ट्री आणि प्रेमाचा दाखवलेला एक वेगळा विषय रसिकांच्या मनपसंतीला उतरला आणि दीपिका स्टार झाली.
काही अभिनेत्री मॉडलिंगपासून आपल्या करिअरची सुरुवात करतात आणि सिनेइंडस्ट्रीत सेटल होतात. परंतु, फार कमी अभिनेत्रींना अगदी कमी वेळेत यशाचे शिखर गाठता येते. त्या अभिनेत्रींपैकी एक स्टार म्हणजे दीपिका पादुकोण. तिचा ५ जानेवारीला वाढदिवस. मॉडलिंग ते सुपरस्टारपर्यंतचा तिचा प्रवास जाणून घेऊयात

.मॉडलिंगने सुरुवात

दीपिकाचे नाव आज बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींच्या यादीत सहभागी आहे. एका कन्नड चित्रपटातून (२००६) तिचा सिनेकरिअरला प्रारंभ झाला. तुम्हाला माहिती आहे का, दीपिका मॉडलिंग करत असताना कशी दिसत होती? दीपिका सुपरमॉडल होती. तिला पहिला ब्रेक मिळाला तो फराह खानमुळे.  'ओम शांती ओम' २००७ मध्ये आलेल्या चित्रपटातून तिने डेब्यू केलं. त्यात शाहरूख प्रमुख भूमिकेत होता. 

दीपिकाचे वडील प्रकाश पादुकोण प्रसिध्द बॅडमिंटनपटू राहिले आहेत. त्यांची इच्छा होती की, दीपिकानेदेखील बॅडमिंटनमध्ये करिअर करावे. परंतु, दीपिकाला मॉडल बनायचे होते. तिने मॉडलिंग करण्यासाठी बेंगलोरमधून मुंबई गाठली. 

दीपिका पादुकोणचा जन्म ५ जानेवारी, १९८६ मध्ये डेन्मार्कच्या कोपनहेगन शहरात झाला. दीपिकाची आई उज्जला ट्रॅव्हल एजंट आहे तर लहान बहीण अनिशा गोल्फर आहे. दीपिका १ वर्षांची असताना तिचे आई-वडील बेंगलोरमध्ये शिफ्ट झाले होते. 

शिक्षण सोडून मॉडलिंग 

बेंगलोरच्या सोफिया हायस्कूलमधून आणि माउंट कार्मल कॉलेजमध्ये तिने शिक्षण घेतले. त्यानंतर दीपिकाने बीए (समाजशास्त्र) मध्ये शिक्षण घेण्यासाठी इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठामध्ये प्रवेश घेतले. नंतर शिक्षण मध्येच सोडून मॉडलिंगमध्ये पाऊल ठेवलं.

बालपणापासूनच जाहिरातीत काम 

८ वर्षांची असताना दीपिकाने अनेक जाहिरातीत काम केले. त्यानंतर लिरिल आणि क्लोज-अप सारख्या ब्रँडसाठी जाहिराती केल्या. ती हिमेश रेशमियाचा अल्बम 'नाम है तेरा..' मध्ये देखील झळकली होती. dinstadinsta

Post a comment

 
Top