0
भारत सरकारने नुकताच भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देण्याची घोषणा केली आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी देशातील जनतेचे आभार मानले. तसेच त्यांनी भारताच्या ७० व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने माध्यमांशी बोलताना भारताने केलेल्या आर्थिक प्रगतीत शेतकऱ्यांचे तसेच युवकांचे योगदान मोठे असल्याचे सांगितले.

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ७० व्या प्रजास्ताक दिनाचे औचित्य साधून माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले ‘गेल्या ७० वर्षात भारताने अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे. दोनशे वर्षे वसाहतवादाचा शिकार बनलेला आणि पिळवणूक झालेला भारत आता आपल्या पायावर उभा राहिला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या ताज्या  अहवालानुसार गेली सलग दोन वर्षे भारताने सर्वाधिक विकासदर राखण्यात यश मिळवले आहे. तसेच भारत हा सर्वोच्च विकासदर सलग तिसऱ्याही वर्षी कायम राखण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये देशातील शेतकऱ्यांचा, युवकांचा आणि इतरांचा महत्वाचा वाटा आहे. भारताची एकता आणि अखंडता कायम राखण्यात देशातील सामान्य जनतेचे सर्वात मोठा वाटा आहे.’

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जाहीर केलेल्या अहवालात भारताचा २०१९-२० या आर्थिक वर्षात विकासदर ७.५ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर या अहवालात जागतिक विकास दर ३.७ टक्के राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

प्रणव मुखर्जींनी भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्यावर भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद तसेच देशातील जनतेचे आभार मानले
 

Post a comment

 
Top