0
कोरेगाव 
पंचक्रोशी शिक्षण मंडळ नामांकित शिक्षण संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडले, सन्मानाने मोठ्या पदावर विराजमान झाले. गेली अनेक वर्ष अखंडीतपणे ज्ञानदानाचे पवित्र काम करणार्‍या पंचक्रोशी शिक्षण मंडळाने खर्‍या अर्थाने समाज घडवण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले, असे गौरवोद‍्गार खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी काढले.


रहिमतपूर, ता.कोरेगाव पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या अमृतमहोत्सवी सांगता सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी  महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील, आ. बाळासाहेब पाटील,  विजय कुवळेकर, संस्था अध्यक्षा सौ. चित्रलेखा कदम, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील माने, नगराध्यक्ष आनंदा कोरे, भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, जि.प. सदस्य मनोजदादा घोरपडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

खा. उदयनराजे म्हणाले, या संस्थेने विद्यार्थांच्या व्यक्‍तिमत्वाला पैलू पाडण्याचे काम करत गुणवत्तेला प्राधान्य दिले. यामुळे या संस्थेचे नाव सर्वदूर पोहचले आहे. ना. पाटील म्हणाले, ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आवश्यक त्या सुविधा दिल्या तर विद्यार्थी व शिक्षक टिकतील यासाठी शासनाचा प्रयत्न सुरु आहे. या अनुषंगाने ग्रामीण जीवन समृध्द  होईल,  तसा सरकारचा प्रयत्न सुरु आहे. संस्थेच्या माध्यमातून सौ. चित्रलेखा माने-कदम ग्रामीण मुलामुलींमध्ये शिक्षण पोहचवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना आम्ही सर्वतोपरी सहकार्य करु, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिले.

यावेळी आ. बाळासाहेब पाटील, विजय कुवळेकर,  लुसी कुरयिन, सौ. सुनंदा पवार, सुनील माने यांनी मनोगत व्यक्‍त केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ‘पंचाहत्तरीच्या पाऊलखुणा’ या स्मरणिकेचे  प्रकाशन करण्यात आले. तर सौ. सुनंदा पवार यांचा महाराणी जमनाबाई गायकवाड आदर्शमाता तर अधिक कदम यांचा युवा आयकॉन पुरस्काराने सन्मान करण्यात आला. सौ. चित्रलेखा कदम यांनी प्रास्तविक केले. प्रा. प्रशांत साळवे यांनी सूत्रसंचलन केले. सौ. प्रियंका कदम यांनी आभार मानले.कार्यक्रमासाठी आजी माजी विद्यार्थी- विद्यार्थिनी, शिक्षक,  शाखाप्रमुख, विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक संख्येने उपस्थित होते.

Post a comment

 
Top