0
नवी दिल्‍ली : 

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी देशात सुरु असलेल्‍या धर्म परिवर्तनावर चिंता व्यक्‍त केली आहे. विज्ञान भवन येथे आयोजित करण्यात आलेल्‍या एका कार्यक्रमात बोलताना राजनाथ सिंह म्‍हणाले, ‘‘स्‍वेच्छेने कोणी र्धम परिवर्तन करत असेल तर त्‍याचा कोणालाही काही त्रास होत नाही. परंतु, मोठ्या प्रमाणावर धर्मांतर होणे हे कोणत्‍याही देशासाठी चिंतेचा विषय आहे. आम्‍ही पराभूत झालो तरी चालेल पण धर्मभेद करणार नाही,’’ असे परखड मत राजनाथ सिंह यांनी व्यक्‍त केले आहे.
राजनाथ सिंह पुढे बोलताना म्‍हणाले की, ‘‘जर कोणी हिंदू असेल तर हिंदूच राहावे, मुस्‍लिम असेल तर मुस्‍लिमच राहावे आणि ख्रिश्चन असेल तर ख्रिश्चनच राहावे. पूर्ण जगाचे धर्मांतर करण्याचा कयास कशासाठी ? असा प्रश्न राजनाथ यांनी केला. ब्रिटन आणि अमेरिकेत अल्‍पसंख्यांक समाज धर्मपरिवर्तनावर निर्बंध आणण्यसाठी कायदा करण्याची मागणी करतात. परंतु, आपल्‍या देशात बहुसंख्यांक समाज याची मागणी करत आहे. हा चिंतेचा विषय आहे, असेही ते म्हणाले.

आमचा पराभव झाला तरी चालेल पण आम्‍ही लोकांमध्ये भेदभाव करत नाही. कोणत्‍याही धर्माचे पालन करण्याच्या स्‍वातंत्र्याचे समर्थन करत असलो तरी मोठ्या संखेने धर्म परिवर्तन होणे हे देशाच्या दृष्‍टीने चिंतेची बाब आहे. मी कधीही जात, धर्म आणि पंथाच्या आधारावर भेदभाव केला नाही. मते मिळो किंवा न मिळो, सरकार स्‍थापन करु किंवा न करु परंतु, आम्‍ही लोकांमध्ये भेदभाव करणार नाही, असे गृहमंत्री म्हणाले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही हेच विचार असून प्रेमाशिवाय कोणीही सत्‍ता किंवा सरकार स्‍थापन करु शकत नाही, असेही ते म्हणाले.  

Post a Comment

 
Top