कोल्हापूर :
शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य आणि सुराज्य संकल्पनेला मूर्तरुप देणार्या राजमाता जिजाऊ यांची आज ४२१ वी जयंती. यानिमित्त बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवभक्तांनी मोठी गर्दी केली आहे. राजमाता जिजाऊ यांचा जन्म १२ जानेवारी इस १५९८ रोजी बुलडाणा येथील सिंदखेडराजा येथे झाला.
राजमाता जिजाऊ जन्म भुईकोट राजवाड्यामध्ये १५९८ मध्ये झाला. हा भव्यदिव्य राजवाडा सिंदखेड राजा नगरीमध्ये मुंबई-नागपूर महामार्गजवळ आहे. याच वस्तूसमोर नगरपालिका निर्मित एक बगीचादेखील आहे. येथेच समोर राजे लखुजीराव जाधवांचे समाधीस्थळ आहे.
सिंदखेडराजा येथे नीलकंठेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. यामध्ये संपूर्ण पाषाणातून साकारलेले हरिहाराचे शिल्प आहे. राजे लखुजीराव जाधव यांनी मंदिराचे पुर्नजीवन करून शिलालेख कोरलेला आहे.

Post a Comment