पीडित मुलगी सध्या दहावीत शिकत आहे. लैंगिक अत्याचार होत असल्या कारणाने तिच्या अभ्यासावरही परिणाम झाला आहे.
मुंबई- आपल्या अल्पवयीन सावत्र मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्या नराधम बापाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. आतीक शेख (वय-52) असे या आरोपीचे नाव आहे. पत्नी घरी नसताना आरोपी मोबाईलवर ब्ल्यू फिल्म पाहून मुलीवर बलात्कार केरत होता. मागील तीन महिन्यांपासून हा प्रकार सुरु होता. कल्याणमधील बाजारपेठ परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. पीडित मुलीच्या आईने पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे हे प्रकरण?
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी आतीक शेख याचा 2008 मध्ये पीडितेच्या आईसोबत विवाह झाला होता. पीडित मुलगी सध्या दहावीत शिकत आहे. लैंगिक अत्याचार होत असल्या कारणाने तिच्या अभ्यासावरही परिणाम झाला आहे. याबाबत कुठेही वाच्यता केली तर आई आणि तुझ्या मामाला ठार मारेल, अशी धमकीही आरोपीने पीडितेला दिली होती.
ही घटना उघडकीस आली तेव्हा मुलीची आई तिला एका कार्यक्रमानिमित्त भावाच्या घरी घेऊन जाणार होती. आरोपीने मुलीला घेऊन जाण्यास नकार दिला. यामुळे मुलीच्या आईला संशय आला. ती परत आली तेव्हा मुलगी आजारी होती. तिने मुलीला भावाच्या घरी घेऊन गेली. तिथे तिला विश्वासात घेतले असता पीडितेने आपबिती कथन केली. पीडितेच्या आईने तात्काळ एका एनजीओची मदत घेऊन पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली.

Post a Comment