0
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत दरवाढ होण्यास पुन्हा सुरूवात झाली आहे.
नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत दरवाढ होण्यास पुन्हा सुरूवात झाली आहे. कच्चा तेलाच्या किंमती वाढल्याने तेल विक्रेत्या कंपन्यांनी सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 69 रुपयांपेक्षा जास्त झाले आहेत. इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार मुंबईत गुरूवारी पेट्रोल 69.07 रुपये होते ते काल शुक्रवारी 74.72 रुपये इतके झाले होते. त्यानंतर आज पेट्रोल 75 रुपये प्रती लीटरने मिळत आहे. तर चेन्नईमध्ये पेट्रोलची किंमत 71.20 रुपयांवरून 71.67 इतकी झाली होती. आता चेन्नईत पेट्रोलची किंमत 72 रुपये प्रति लीटर झाली आहे.
कच्चा तेलाच्या किंमती घसरल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत आणखी वाढ होऊ शकते. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड तेलाची किंमत 60 डॉलरच्या पार पोहोचली आहे. गेले काही दिवस ही किंमत 50 डॉलर प्रति बॅलरच्या आसपास होती. त्यानंतर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी केल्या होत्या. क्रूड ऑईल महागल्याने कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवण्यासाठी दबाव टाकायला सुरूवात केली आहे.
कच्चा तेलाच्या कमतरतेचा पूर्ण फायदा सर्वसामान्यांना देण्यात आला. आता कच्चा तेलाची किंमत वाढली तर त्याचा भारही सर्वसामान्यांवरच दिला जातोय असे तेल कंपन्यांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. तेल निर्यात देशांची संघटना ओपेकचे उत्पादन घटल्याने आणि जागतिक स्तरावर मागणी वाढल्याने क्रूड तेलाची किंमत वाढून 60 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचली आहेपेट्रोल. डिझेलच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी वाढ पेट्रोल. डिझेलच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी वाढ Image result for petrol diesel price zee news.

Post a Comment

 
Top