0
मंगलसिंग याने संपतसिंग याच्या डोक्यात दगड घालून हत्या केली. नंतर मंगलसिंग पत्नीसह पसार झाला आहे.
पुणे-डोक्यात दगड घालून मामाने भाच्याचा खून केल्याची घटना बुधवारी पहाटे पुण्यातील हडपसर परिसरातील फुरसुंगी रेल्वे गेटजवळ घटना आहे. संपतसिंग माणिकलाल (वय-52, रा दिंडोरी, मध्यप्रदेश) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

मंगलसिंग मोया व त्याची पत्नी इंदियाबाई मोया ( मूळ रा.अमरपूर मध्यप्रदेश) हे दाम्पत्य फुरसुंगी रेल्वे रुळाजवळील फडतरे वस्तीत राहात होते. मंगलसिंग याने संपतसिंग याच्या डोक्यात दगड घालून हत्या केली. नंतर मंगलसिंग पत्नीसह पसार झाला आहे.


आरोपीचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांची तीन पथके रवाना झाली आहेत. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला आहे. मृत संपतसिंग आणि मंगलसिंग हे दोघे रेल्वे रुळ टाकणारे रोजंदारी कामगार आहेत. दोघे दोन दिवसांपूर्वी कामाकरिता मध्यप्रदेश येथून आलेले आहेत.
Murder in Pune Hadapsar Area

Post a Comment

 
Top